आजकाल आई-वडील आपल्या मुलांची नावं इतकी वेगळी का ठेवतात?

पुढारी वृत्तसेवा

आजकाल मुलांची नावं इतकी वेगळी का?

पूर्वी पारंपरिक नावांना पसंती होती. आता मात्र आई-वडील आपल्या मुलांसाठी युनिक, आधुनिक आणि लक्षात राहतील अशी नावं शोधत आहेत.

सर्वांपेक्षा वेगळं नाव हवं

आजच्या पालकांना आपल्या मुलाचं नाव शाळा, कॉलेज किंवा समाजात इतरांपेक्षा वेगळं असावं असं वाटतं. म्हणून युनिक नाव ठेवली जात आहेत.

आई-बाबांच्या नावातून तयार होतं नवीन नाव

अनेक पालक आपल्या नावातील अक्षरे एकत्र करून मुलाचं नवीन नाव तयार करतात. त्यामुळे नाव कुटुंबाशी जोडलेलं वाटतं.

परदेशी संस्कृतीचा प्रभाव

इंटरनेट, चित्रपट आणि सोशल मीडियामुळे इंग्रजी, स्पॅनिश किंवा इतर भाषांतील नावांचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे आधुनिक वाटणाऱ्या नावांना पसंती मिळते.

अर्थापेक्षा नावाचा टोन महत्त्वाचा

आज अनेक पालक नावाचा अर्थ पाहण्यापेक्षा ते ऐकायला स्टायलिश आणि आकर्षक वाटतं का, याला जास्त महत्त्व देतात.

लहान आणि लक्षात राहणारी नावं

'ज्ञानेश्वर', 'पंढरीनाथ' यांसारख्या मोठ्या नावांऐवजी 'कियान', 'अयांश', 'शनाया', 'कियारा' अशी छोटी आणि सोपी नावं अधिक लोकप्रिय झाली आहेत.

सोशल मीडियाचाही मोठा प्रभाव

भविष्यात ई-मेल आयडी, इंस्टाग्राम, यूट्यूब किंवा वेबसाईटसाठी नाव सहज उपलब्ध व्हावं, याचाही अनेक पालक विचार करतात.

जुन्या पिढीला विचित्र, नव्या पिढीला स्टायलिश!

पूर्वीच्या पिढीला काही नावं अनोखी किंवा विचित्र वाटतात. पण नव्या पिढीसाठी तीच नावं आधुनिक आणि ट्रेंडिंग असतात.

नाव निवडताना काय लक्षात ठेवावं?

नाव युनिक असलं तरी त्याचा अर्थ चांगला, योग्य उच्चार आणि आयुष्यभर सहज वापरता येईल, याकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे.

अण्णाभाऊ साठे यांनी किती पुस्तकं लिहिली? जाणून घ्या त्यांच्या साहित्यविश्वाची थक्क करणारी कहाणी

येथे क्लिक करा