Honey with Warm Water & Lemon|मध, कोमट पाणी, लिंबू एकत्र घेणे योग्य की अयोग्य?

पुढारी वृत्तसेवा

आयुर्वेदानुसार मध कधीही गरम किंवा कोमट पाण्यासोबत घेऊ नये.

आयुर्वेदातील चरक संहितेत मधाला गरम करून किंवा गरम पदार्थांसोबत खाण्यास सक्त प्रतिबंध करण्यात आले आहे.

मध हा निसर्गाने उष्ण आणि सूक्ष्म गुणांचा असतो.

मध गरम केला जातो/ अत्यंत कोमट पाण्यात मिसळला जातो. तेव्हा त्याचे रासायनिक गुणधर्म बदलतात.

हा गरम मध शरीरात पचण्यास कठीण होतो आणि 'आम' (टॉक्सिन्स) तयार होतात.

असा मध पचनसंस्थेच्या वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतो.

यामुळे पचनक्रिया मंदावते. त्वचाविकार, वजन/पोटदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.

लिंबू (अम्ल/आंबट), मध (मधुर/गोड) यांचे गरम पाण्यासोबतचे मिश्रण 'विरुद्ध आहार' मानले जाते.

योग्य पद्धत कोणती? पाणी आधी उकळून ते सामान्य तापमानावर ठेवा

ते पाणी साधे असताना त्यात अर्धा चमचा मध आणि थोडे लिंबू पिळून घ्या.

यामुळे मधातील पोषक तत्त्वे सुरक्षित राहतात, शरीराला फायदा होतो.

Remove Fevikwik from Hands-हाताला फेविक्विक चिकटल्यास, निघत नसल्यास काय करावे?