नेपाळमध्ये रविवारची सुट्टी का नसते? काय आहे इतिहास?

Rahul Shelke

रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस

आपल्याकडे रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. काम, शाळा, ऑफिस सगळं बंद असतं.
पण नेपाळमध्ये हे चित्र पूर्ण वेगळं आहे.

Nepal Weekly Holiday | Pudhari

नेपाळमध्ये रविवारी कामाचा दिवस

नेपाळमध्ये रविवारी शाळा भरतात, ऑफिस उघडी असतात, आणि रोजच्यासारखं कामकाज सुरू असतं.

Nepal Weekly Holiday | Pudhari

नेपाळमध्ये रविवारी सुट्टीच का नसते?

मग प्रश्न पडतो… नेपाळमध्ये रविवारी सुट्टी का नसते? यामागे एक इतिहास आणि परंपरा आहे.

Nepal Weekly Holiday | Pudhari

आठवड्याची सुट्टी शनिवारी असते

नेपाळमध्ये आठवड्याची एकमेव सुट्टी शनिवारी असते. या दिवशी शाळा, बँका, सरकारी कार्यालयं बंद असतात.

Nepal Weekly Holiday | Pudhari

कामाचा आठवडा रविवारपासून सुरू

नेपाळमध्ये कामाचा आठवडा रविवारपासून सुरू होतो आणि शुक्रवारपर्यंत चालतो. शनिवार म्हणजे पूर्ण विश्रांतीचा दिवस.

Nepal Weekly Holiday | Pudhari

नेपाळमधील परंपरा

ही परंपरा नेपाळमधील राणा शासनकाळात सुरू झाली. त्या काळात शनिवारची सुट्टी अधिकृत करण्यात आली.

Nepal Weekly Holiday | Pudhari

ब्रिटिश राजवट

जगातल्या अनेक देशांत रविवारची सुट्टी ख्रिश्चन परंपरेतून आली. पण नेपाळवर ब्रिटिश राजवट कधीच नव्हती.

Nepal Weekly Holiday | Pudhari

नेपाळ स्वतंत्र राष्ट्र

नेपाळ स्वतंत्र राष्ट्र राहिलं. म्हणूनच त्यांनी आपली संस्कृती आणि परंपरा वेगळी जपली.

Nepal Weekly Holiday | Pudhari

शनिवारचं महत्त्व

नेपाळी संस्कृतीत शनिवार हा पूजा, विश्रांती आणि शांततेचा दिवस मानला जातो.
नवीन काम सुरू करणंही या दिवशी टाळलं जातं.

Nepal Weekly Holiday | Pudhari

नेपाळची ओळख

म्हणूनच नेपाळमध्ये रविवार नाही, शनिवार सुट्टीचा दिवस आहे. ही नेपाळची खास ओळख आहे.

Nepal Weekly Holiday | Pudhari

बांगलादेशातील सर्वात मोठी कंपनी कोणती? तिथला अंबानी कोण आहे?

Bangladesh’s Biggest Company | Pudhari
येथे क्लिक करा