Rahul Shelke
बांग्लादेशात सध्या राजकीय आणि सामाजिक अस्थिरता आहे. अशा वेळी एक प्रश्न नेहमी विचारला जातो, तिथली सर्वात मोठी कंपनी कोणती?
बांग्लादेशाबाबत दोन प्रश्न आहेत. सर्वात मोठी कंपनी कोणती? आणि सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण?
मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारावर ग्रामीणफोन लिमिटेड ही बांग्लादेशची सर्वात मोठी कंपनी आहे.
2024 अखेरीस ग्रामीणफोनचं मार्केट व्हॅल्यूएशन सुमारे 3.6 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं होतं. ढाका स्टॉक एक्सचेंजमधील ही सर्वात मोठी कंपनी आहे.
ग्रामीणफोन ही टेलिकॉम कंपनी आहे. बांग्लादेशभर लाखो लोकांना मोबाईल सेवा पुरवते. ही कंपनी शेअर बाजारात लिस्टेड आहे.
ग्रामीणफोनचा मालक एक व्यक्ती नाही. सुमारे 55.8% हिस्सा नॉर्वेच्या टेलीनॉर कंपनीकडे आणि 34% हिस्सा ग्रामीण टेलिकॉमकडे आहे.
ग्रामीण टेलिकॉम ही नॉन-प्रॉफिट संस्था आहे. ही संस्था नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांनी स्थापन केली आहे.
बेक्सिमको ग्रुप – उद्योग विस्तारासाठी प्रसिद्ध
वॉल्टन – महसुलाच्या बाबतीत मोठं नाव
तरीही शेअर बाजार मूल्यामध्ये ग्रामीणफोन पुढे आहे.
वैयक्तिक संपत्तीच्या बाबतीत मूसा बिन शमशेर हे नाव सर्वात पुढे येतं. त्यांना 'बांग्लादेशचा अंबानी' असं म्हटलं जातं.
मूसा बिन शमशेर DATCO ग्रुपचे संस्थापक आहेत. मॅनपॉवर एक्सपोर्ट, ट्रेडिंग, डिफेन्स हे त्यांचे क्षेत्र. त्यांची अंदाजे संपत्ती 12 अब्ज डॉलर इतकी आहे.