तुम्हाला माहिती आहे का पान खाल्ल्यावर तोंड लाल का होते? कोणती रासायनिक प्रक्रिया घडते

Namdev Gharal

आपण नेहमी पाहतो की पान खाताना त्‍यामध्ये चुना, कात, सुपारी, बडीशेप असे पर्दार्थ घातले जातात यामध्ये कोणताही लाल रंग नसतो  

पण ज्यावेळी हे पान चघळले जाते त्‍यावेळी तोडांमध्ये आपोआप लाल रंगाची लाळ तयार होऊ लागते असे का होते. यसापाठीमागे आहे एक रासायनिक प्रक्रिया

काहींना वाटेल क कातामुळे तोंड व जीभ लाल होत असेल. पण यासाठी कारणीभूत असतात दोन महत्त्वाचे घटक ते म्हणजे कात व चुना यांच्याशिवाय विड्याला तो गडद लाल रंग येऊ शकत नाही.

कातामध्ये 'कॅटेचिन' (Catechin) नावाचे तत्व असते. जेव्हा चुन्यासारखा अल्कली (Alkali) पदार्थ काताबरोबर मिसळतो, तेव्हा रासायनिक बदल सुरू होतात.

विडा चघळताना तोंडातली लाळ या मिश्रणात मिसळते. लाळ आणि हवेतील ऑक्सिजनमुळे 'ऑक्सिडेशन'ची प्रक्रिया घडते आणि रंग लाल होऊ लागतो.

याबरोबर आणखी एक घटक लांल रंग होण्यासाठी कारणीभूत आहे, सुपारी यामध्ये असलेले 'टेनिन' (Tannin) या प्रक्रियेला अधिक गती देते.

या सर्व पानाच्या विड्यातील घटकांमुळे फिकट लाल रंगाचे रूपांतर गडद लाल किंवा विटकरी रंगात होते.

हा कोणताही कृत्रिम रंग नसून पूर्णपणे नैसर्गिक रासायनिक प्रक्रियेचा परिणाम आहे. म्हणूनच जुन्या काळी ओठ रंगवण्यासाठी विड्याचा वापर केला जात असे.

पण आपल्याकडे पान खाऊन रस्ते, भिंती रंगवणारे खूपजण असतात. त्‍यामुळे अनेक ठिकाणी येथे थुंकू नये असे बोर्ड लावावे लागतात.

Tibetan Mastiff .....प्रसंगी वाघ- लांडग्यांशीही लढणारा महाकाय शक्तिशाली कुत्रा!