Tibetan Mastiff .....प्रसंगी वाघ- लांडग्यांशीही लढणारा महाकाय शक्तिशाली कुत्रा!

Namdev Gharal

Tibetan Mastiff तिबेटीयन मस्टिफ हा एक विशाल आकाराचा कुत्रा असून तो इतका शक्तिशाली असतो की एकटा वाघ, बिबट्या किंवा लांडग्याशी लढू शकतो.

याचा आकारही इतर कुत्र्यांपेक्षा मोठा असतो याची उंची साधारण ३० इंचांपर्यंत असते आणि वजन ८०-९० किलोपर्यंत असू शकते.

त्‍याच बरोबर जगातील सर्वात महागडा, शक्तिशाली आणि भीतीदायक कुत्र्यांपैकी एक मानला जातो.

तिबेटी मस्टिफचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या मानेभोवती असलेले केस. हे केस एखाद्या सिंहाच्या आयाळीसारखे दिसतात. यामुळेच या कुत्र्याला 'लायन डॉग' असेही म्हटले जाते.

हा कुत्रा त्याच्या दुर्मिळतेमुळे आणि देखण्या स्वरूपामुळे अतिशय महाग आहे. २०१४ मध्ये चीनमध्ये एक 'गोल्डन हेअर्ड' तिबेटी मस्टिफ तब्बल १२ कोटी रुपयांना ($1.9 Million) विकला गेला होता.

याच्या ब्रीडचा इतिहास पाहता हा जगातील सर्वात जुन्या कुत्र्यांच्या जातींपैकी एक आहे. तिबेटी लोक मानतात की या कुत्र्यांमध्ये बौद्ध भिक्षूंचा आत्मा असतो.

याचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे हिमालयातील कडाक्याच्या थंडीत (-२०° ते -३०° सेल्सिअस) हे कुत्रे आरामात राहू शकतात.

यांची आणखी एक सवय म्हणजे दिवसभर झोपून राहतात आळशी कुत्र्यासारखे पण रात्री ते अत्यंत सतर्क होतात. पूर्वी तिबेटी लोक रात्रीच्या वेळी गावाच्या आणि गुरांच्या रक्षणासाठी यांना साखळदंडाने बांधून ठेवत असत.

हे कुत्रे खूप आक्रमक आणि जिद्दी असतात. काहीवेळा ते मालकाचेसुद्धा ऐकत नाहीत. त्यामुळे यांना सांभाळणे खूप अवघड असते

याचा आहारही खूप मोठा असतो दिवसभर याला भरपूर मांस तसेच प्रोटीन असलेले खाद्य द्यावे लागते

तसचे याचे आर्युमान १२ ते १५ वर्षे इतके असते. तसेच कुटुंबासाठी अतिशय निष्ठावान असतात पण अनोळखी व्यक्तींसाठी अत्यंत धोकादायक असतात.

Gray Peacock : चंदेरी रंगाचा मोर पाहिला आहे का?