Namdev Gharal
आपण अनेकदा पाहतो की रात्रीच्यावेळी अनेक पंतग, किटक हे लाईटभोवती फिरत असतात. पण हे असे का करतात याचे शास्त्रीय कारण काय आहे.
रात्रीच्या वेळी बाहेर पडणाऱ्या बहूतेक किटकांमध्ये चंद्राच्या मंद प्रकाशाचा उपयोग दिशादर्शनासाठी करतात. निसर्गानेच त्यांना हे वरदान दिलेले असते
त्यांच्या मेंदूत असा “कंपास” असतो की ते चंद्राच्या प्रकाशाशी एक ठराविक कोन राखून उडू शकतात
पण जेव्हा मनुष्यनिर्मित तेजस्वी प्रकाश (बत्ती, ट्युबलाईट, दिवा, मोबाईल फ्लॅश) दिसतो. तेव्हा ते त्याला चंद्र समजून त्याच्याभोवती कोन राखण्याचा प्रयत्न करतात
परिणामी ते प्रकाशाभोवती गोल गोल फिरत राहतात आणि जास्त जवळ जातात.यालाच Phototaxis (प्रकाशाचे आकर्षण) म्हणतात.
अजून एक कारण म्हणजे अंधाऱ्या वातावरणात पतंगांना धोका वाटतो. प्रकाशाच्या दिशेने गेल्याने जगणे सुरक्षित वाटते. त्यामुळे भीतीपासून बचाव म्हणून ते प्रकाशाकडे झेपावतात.
काही कीटकांना उष्णता संबंधित संवेदना जास्त असतात. जुने पिवळसर बल्ब उष्णता देतात, त्यामुळे कीटक त्या उष्णतेकडे आकर्षित होतात आणि अगदी त्यात जळून मरतात.
काही कीटकांची नजर UV प्रकाशास जास्त संवेदनशील असते. ट्युब लाईट, CFL, LED मध्ये सूक्ष्म प्रमाणात UV असते, जी त्यांना झटपट आकर्षित करते.
UV प्रकाश फुलांवरून परावर्तीत होऊन मधमाशा/पतंग खाद्य शोधतात. कृत्रिम प्रकाश फुलांच्या परावर्तनासारखा भास देतो. त्यामुळे कीटक त्या दिशेला जातात.