Namdev Gharal
पुष्पा चित्रपटातील नायक महाग दुर्मिळ असलेल्या लाल चंदनाची तस्करी करताना दाखवला आहे. हे लाकूड खूपच महाग असते पण याच्यापेक्षाही एक लाकूड आहे. ज्याला काळे सोने म्हटले जाते.
याचे नाव आहे आफ्रिकन ब्लॅकवूड african blackwood, याची किंमत ऐकली तर, अनेकांचे डोळे फिरतील. कारण काही ठिकाणी याची किंमत 7 लाख रुपये किलो इतकी जाते. रक्त चंदन हे 1,000–₹8,000/किलो एवढे असते.
आफ्रिकेतील टांझानिया या देशात याचे सर्वाधिक उत्पादन होते त्याचबरोबर मोजांबिक, केनीया, मलावी, या देशांमध्येही हे लाकूड मिळते
याची किमंत सर्वाधिक असण्यामागे याचे गुण आहे. हे लाकूड सर्वात जास्त घनता असलेले आहे. 100 वर्षांपेक्षा जास्त वर्षे टिकून राहते.
त्याचबरोबर याचा ध्वनीगुणधर्म अत्यंत चांगला असतो. त्यामुळे वाद्यनिर्मितीत सर्वात जास्त वापर याच लाकडाचा केला जातो. या लाकडाला वाळवी किंवा बुरशी लागत नाही
गिटार, क्लॅरिनेट, ओबो, बॅगपाइप्स, फ्लूट, झायलोफोन बार्स इत्यादी वाद्य तयार करण्यासाठी हे सर्वोत्तम मानले जाते. तसेच अनेक चाकू तलवारींसाठी हँडल्स ही तयार केले जातात
अत्यंत दुर्मिळ आहे - हे झाड पूर्ण परिपक्व होण्यासाठी 70 ते 100 वर्षे लागतात तर रक्तचंदनाचे झाड 20 - 40 वर्षात परिपक्व होते. आणि अत्यंत कठीण असते
पॉलिश केल्यास हे आरशासाखे चमकते याचा रंग नैसर्गिक गडद काळा, कधी कधी जांभळट किंवा तांबूस काळा असतो.
या झाडाला Mpingo असे म्हणतात आणि आफ्रिकेत ते पवित्र झाड मानले जाते. पारंपरिक नृत्य-वाद्यांमध्ये याचा वापर सांस्कृतिक ओळख बनला आहे.
जगभर याला प्रचंड मागणी असते, किमती इतक्या की काही ठिकाणी सोन्यापेक्षाही महाग आहेत. त्यामुळे काळे सोनेही म्हटले जाते.
हा झाडांचा प्रकार फक्त आफ्रिकेच्या उष्ण व कोरड्या प्रदेशात नैसर्गिकरित्या आढळतो. हा इतर देशांत उपलब्ध असला तरी तेथे उत्पादन (natural growth) होत नाही.