पुढारी वृत्तसेवा
खरं तर यामागे टेलिकॉम क्षेत्रातील गणिती शास्त्र आणि तांत्रिक कारणं दडलेली आहेत.
भारतात प्रत्येक सिमकार्डला स्वतंत्र ओळख मिळावी यासाठी 10 अंकी नंबरची रचना करण्यात आली.
१० अंकांच्या नंबरमुळे साधारण १० अब्ज (१०० कोटी × १०) इतके वेगवेगळे नंबर तयार होऊ शकतात.
ही संख्या देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त असल्याने प्रत्येकाला वेगळा नंबर देणं शक्य होतं.
सुरुवातीला भारतात ७ अंकी लँडलाईन नंबर प्रचलित होते.
मात्र मोबाईल फोन वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नंबरची गरज भासली.
म्हणूनच टेलिकॉम नियामकांनी १० अंकी मोबाईल नंबर निश्चित केला.
त्यामुळे आज प्रत्येक मोबाईलधारकाला वेगळा व सोप्या पद्धतीने लक्षात राहणारा नंबर मिळतो.