पुढारी वृत्तसेवा
गाडीची चावी, पाकीट आणि मोबाईलसोबत खिशात छोटा कंगवा ठेवणे ही बहुतांश पुरुषांची सवय असते.
खिशात छोटा कंगवा ठेवणे ही फक्त एक साधी ग्रूमिंग सवय आहे की त्यामागे मानसशास्त्र कार्य करते? जाणून घेऊया.
"मानसशास्त्रानुसार, खिशात कंगवा बाळगणे ही सहज क्रिया आहे. समाजशास्त्रज्ञ एर्व्हिंग गोफमन यांच्या मते, लोक समाजात स्वतःची शिस्तबद्ध प्रतिमा निर्माण करण्यासाठी बाह्य रूपाकडे विशेष लक्ष देतात."
मानसशास्त्रज्ञ एडवर्ड जोन्स यांनी १९६४ मध्ये मांडलेल्या Ingratiation Theory नुसार, इतरांवर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी आणि स्वतःची 'टीपटॉप' प्रतिमा जपण्यासाठी लोकांना अशा लहान-सहान सवयी असतात.
सोबत कंगवा ठेवणारे पुरुष स्वतःच्या 'प्रेझेंटेशन'बाबत खूप गंभीर असतात. स्वतःचे कपडे आणि केसांच्या लुकवर ते विशेष बारीक लक्ष ठेवून असतात.
'काही बिघडले तर मी ते लगेच ठीक करू शकतो' हा आत्मविश्वास या सवयीमुळे पुरुषांमध्ये निर्माण होतो.
खिशात कंगवा ठेवणे हे पुरुषांसाठी स्वतःवरील एका लहानशा 'कंट्रोल टूल'सारखे काम करते.
खिशात कंगवा ठेवणे फक्त वैयक्तिक काळजी, रोजचा ग्रूमिंग रुटीन किंवा प्रत्येक प्रसंगासाठी तयार राहण्याची एक साधी मानसिक सवय आहे.
असा अर्थ असा नाही की, कंगवा ठेवत नाहीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काही दोष आहे. यावरून एवढेच समजते की कंगवा ठेवणारे पुरुष आपल्या दिसण्याबद्दल अधिक आग्रही किंवा थोडे जास्त जागरूक असतात.