Tondli Benefits : साधी वाटणारी 'तोंडली' ठरतेय अनेक आजारांवर गुणकारी; वाचा त्याचे आश्चर्यकारक फायदे!

पुढारी वृत्तसेवा

तोंडली ही आपल्या सर्वांच्या परिचयाची भाजी असून पावसाळ्यात शेतात व मळ्यांत तिची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

तोंडली कडू आणि गोड अशा दोन प्रकारांत आढळतात. सर्वसाधारणपणे स्वयंपाकासाठी कोवळ्या गोड तोंडल्यांचा वापर केला जातो.

तोंडली पचण्यास जड असल्याने तिचे अती सेवन केल्याने जीभ जड होते. तसेच मलावरोध व पोटात गॅस होण्याचा त्रास वाढू शकतो.

कडू तोंडल्यांच्या पानांचे चूर्ण किंवा तोंडल्याची भाजी मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत हितकारक मानली जाते.

जिभेला चिरा पडल्या असल्यास तोंडली दाताखाली चावून त्याचा रस काही वेळ तोंडात ठेवल्याने चांगला आराम मिळतो.

तोंडल्याच्या पानांचा रस किंवा पोटीस बांधल्याने गळवाची वेदना दूर होते, तसेच दुखणाऱ्या जखमेवर पानांचा रस लावणे फायदेशीर ठरते.

कडू तोंडल्याच्या पानांचा रस विंचवाच्या दंशावर अत्यंत गुणकारी मानला जातो.

इतर फळभाज्यांच्या तुलनेत तोंडलीमध्ये अधिक पोषणमूल्ये असतात. ती शरीरातील व्रण आणि जखमा लवकर भरून काढण्यास मदत करतात.

येथे क्‍लिक करा.