पुरुष महिलांपेक्षा उंच का असतात? शास्त्रज्ञांनी उलगडलं रहस्य

मोहन कारंडे

पुरुष नेहमी महिलांपेक्षा सरासरी ५ इंचांनी जास्त उंच का असतात? शास्त्रज्ञांनी शास्त्रीय कारण अखेर शोधलं आहे.

संशोधकांनी उंचीच्या या फरकामागील संभाव्य कारण म्हणून 'SHOX' हा विशिष्ट जनुक सांगितलं आहे.

SHOX' नावाचा खास जीन पुरुषांची उंची वाढवतो

अमेरिका आणि ब्रिटनमधील १ लाख लोकांच्या जीन डेटावर संशोधन, हा जीन पुरुषांमध्ये अधिक सक्रिय असतो. त्यामुळे त्यांची उंची महिलांपेक्षा अधिक असते.

महिलांमध्ये हा जीन पूर्णपणे सक्रिय नसतो!

कारण त्यांच्या दोन X क्रोमोसोमपैकी एक निष्क्रिय असतो, ज्यामुळे SHOX जीन कमी प्रभावी ठरतो.

Y क्रोमोसोम असलेल्या पुरुषांमध्ये SHOX अधिक कार्यरत

हा जीन Y क्रोमोसोमवर जास्त अ‍ॅक्टिव्ह असल्याने पुरुष उंच होतात.

हा एकटाच जीन संपूर्ण फरक सांगत नाही...

शोधात सांगितलं की उंचीतील एक चौथाई फरक 'SHOX' मुळे असतो, बाकी इतर जीन आणि हार्मोनमुळे.

टेस्टोस्टेरोनसारख्या हार्मोन्सचाही उंचीवर प्रभाव

पुरुषांमध्ये असणारे हार्मोन्स शरीराच्या वाढीस चालना देतात.

उंचीच्या रहस्यामागे 'जेनेटिक्स'चा मोठा हात

उंची ही पूर्णपणे अनुवांशिक घटकांवर अवलंबून असते, हे यामुळे स्पष्ट झालं.

या शोधामुळे अनेक जुनी कोडी सुटलीत : शास्त्रज्ञ शाड्ट

जेनेटिक्स एक्सपर्ट एरिक शाड्ट यांनी याला एक रोमांचक शोध म्हटलं आहे.

आता समजलं पुरुष महिलांपेक्षा नेहमीच उंच का दिसतात!

'SHOX' जीन आणि Y क्रोमोसोमचं हे रहस्य आता विज्ञानाने उलगडलं आहे.

क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ल्यादरम्यान ब्लॅकआउट का केले जाते?