क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ल्यादरम्यान ब्लॅकआउट का केले जाते?

मोहन कारंडे

 ब्लॅकआउट म्हणजे काय?

ब्लॅकआउट म्हणजे शहरातील सर्व दिवे, स्ट्रीट लाइट्स आणि वाहनांच्या हेडलाइट्स बंद करून पूर्ण अंधार निर्माण करणे.

file photo

हल्ला टाळण्यासाठी महत्त्वाचं पाऊल

ब्लॅकआउटमुळे शत्रूच्या ड्रोन किंवा क्षेपणास्त्रांना लक्ष्य शोधणं कठीण जातं, त्यामुळे हल्ला अचूक होत नाही.

शत्रूची दिशाभूल

पूर्ण अंधारामुळे शत्रूच्या ड्रोन किंवा विमानांना कोणताही प्रकाश दिसत नाही, त्यामुळे त्यांचा मार्ग चुकतो.

लक्ष ओळखणं होतं कठीण

GPS आणि सॅटेलाइटद्वारे ठिकाण ओळखता आलं तरी अंधारामुळे टार्गेट अचूक ओळखता येत नाही.

थर्मल आणि इन्फ्रारेड सेन्सर्स फसवणं शक्य

अंधारामुळे ड्रोनवर असलेले इन्फ्रारेड व थर्मल सेन्सर्स देखील चुकीची माहिती देऊ शकतात.

नागरिकांचं सहकार्य अत्यावश्यक

ब्लॅकआउट यशस्वी होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने घरातील आणि बाहेरील सर्व दिवे बंद ठेवणे गरजेचे आहे.

प्रशासनाकडून मॉक ड्रिल्स

सरकारकडून युद्धसदृश परिस्थितीत नागरिकांना प्रशिक्षण देण्यासाठी ब्लॅकआउट मॉक ड्रिल्स घेतल्या जातात.

अंधारातच सुरक्षा

शहर अंधारात असल्यास शत्रूला ते कुठे आहे हे समजत नाही, ज्यामुळे मोठा धोका टाळता येतो.

युद्धतंत्र जरी बदललं तरी ब्लॅकआउट उपयोगीच

आजच्या आधुनिक युद्धतंत्रातही ब्लॅकआउट ही एक प्रभावी आणि आवश्यक सुरक्षा यंत्रणा आहे.

धोनीच नाही, हे खेळाडूही आहेत आर्मीतील स्टार्स