Meghalaya Rainfall : देशात सर्वाधिक पाऊस… तरी मेघालयला पूर का येत नाही?

Vishal Bajirao Ubale

जिथे पाऊस विक्रमी, तिथे पूर नाही!

कधी बातम्यांमध्ये ऐकलंय का की मेघालयमध्ये मोठा पूर आला? नाही ना! आणि गंमत म्हणजे देशात सर्वात जास्त पाऊस तिथेच पडतो.

Meghalaya Rainfall | Pexels

पाऊस खूप, त्रास मात्र कमी

चेरापूंजी, मावसिनराम हे जागतिक पावसासाठी प्रसिद्ध ठिकाण आहेत. पण तरीही लोकांचं दैनंदिन आयुष्य फारसं विस्कळीत होत नाही.

Meghalaya Rainfall | Pexels

डोंगर उतार

मेघालयमधले डोंगर सरळ उताराचे आहेत. पाऊस पडला की पाणी थांबत नाही, लगेच खाली वाहून जातं.

Meghalaya Rainfall | Pexels

खडकांमधल्या नैसर्गिक फटी

या डोंगरांमध्ये बारीक-बारीक फटी आहेत. त्या फटींमधून पाणी थेट जमिनीत उतरून जातं.

Meghalaya Rainfall | Pexels

धबधब्यांची किमया

मेघालयचे धबधबे खूप सुंदर आहेत, पण ते पाण्याचा प्रवाह सांभाळण्यासाठीही कामी येतात. पाऊस खूप झाला की हे धबधबे पाणी खाली खेचून नेतात. जणू निसर्गानेच त्यांना हे काम दिलंय असं वाटतं.

Meghalaya Rainfall | Pexels

पूर येण्याचं खरं कारण

देशातील अनेक शहरांमध्ये पूर येतो कारण पाण्याला बाहेर जाण्याचा मार्ग नसतो.

Meghalaya Rainfall | Pexels

मुंबईची मीठी नदी

मीठी नदी कधीकाळी खरी नदी होती, नाला नव्हता. तेव्हा मच्छीमार तिथे मासे पकडायचे. कचऱ्यामुळे नदीला जागा राहिली नाही. सांडपाणी, कचरा आणि अतिक्रमण यामुळे ही नदी गटारसारखी झाली. मग थोडा पाऊस पडला तरी पूर येतो.

Meghalaya Rainfall | Pexels

शेवटी एवढच की निसर्गाला जोपासलं, पाण्याला त्याची जागा दिली तर कितीही पाऊस आला तरी शांतता टिकते.

Meghalaya Rainfall | Pexels
Wildlife Friendly Highway: जीव वाचवणारा..भारतातला पहिलाच आगळावेगळा हायवे