Lord Shiva Shravan month: भगवान शिवाला श्रावण महिना इतका प्रिय का? जाणून घ्या पौराणिक रहस्ये!

पुढारी वृत्तसेवा

समुद्रमंथन

पुराणांनुसार, देव आणि दानवांनी केलेले समुद्रमंथन श्रावण महिन्यात झाले होते

हलाहल विष प्राशन

मंथनातून निघालेल्या घातक विषापासून सृष्टीला वाचवण्यासाठी महादेवाने ते स्वतः प्राशन केले आणि ते 'नीलकंठ' बनले.

शीतल जलवृष्टी

विषाच्या उष्णतेने व्याकूळ झालेल्या शिवाला शांत करण्यासाठी देवांनी जलवृष्टी केली, म्हणून श्रावणात शिवलिंगावर जल अर्पण केले जाते.

पार्वतीची तपस्या

देवी पार्वतीने शिवाला प्राप्त करण्यासाठी याच महिन्यात निराहार राहून कठोर तप केले, ज्यामुळे शिव प्रसन्न झाले.

पृथ्वीवर वास्तव्य

श्रावण महिन्यात महादेव आपल्या घरी हिमालयात म्हणजेच पृथ्वीवर राहण्यास येतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

सुलभ प्रसन्नता

या काळात महादेव अतिशय दयाळू असतात; केवळ पाण्याचा कलश आणि बेलपत्रानेही ते लवकर प्रसन्न होतात.

सोमवार व्रत

श्रावणी सोमवाराला विशेष महत्त्व असून, हे व्रत निष्ठेने केल्यास जीवनातील संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात.

निसर्ग आणि भक्ती

श्रावणात चहूकडे हिरवळ असते. हे सृजन आणि शुद्ध भक्तीचे प्रतीक असल्याने महादेवाला हा महिना प्रिय आहे.

येथे क्लिक करा...