पुढारी वृत्तसेवा
जंगलात बिबट्या शिकार पकडल्यानंतर ती थेट झाडावर घेऊन जातो. पण यामागचं कारण माहितेय का?
शिकार जमिनीवर ठेवली तर सिंह, तरस किंवा इतर मोठे मांसाहारी प्राणी ती हिसकावून घेऊ शकतात. म्हणून बिबट्या सुरक्षित मार्ग निवडतो.
झाडावर गेल्यावर इतर प्राण्यांना शिकार मिळणं कठीण होतं. बिबट्याची मेहनत वाया जात नाही.
बिबट्याचे खांदे आणि पंजे फार ताकदवान असतात. तो स्वतःपेक्षा जड शिकारही झाडावर ओढू शकतो. ही त्याची खास शारीरिक क्षमता आहे.
जमिनीवर सतत धोका असतो… पण झाडावर उंचावर गेल्यावर बिबट्या निवांतपणे शिकार खातो. कोणताही अडथळा येत नाही.
बिबट्या नेहमी एकाच वेळी पूर्ण शिकार खात नाही. कधी कधी तो ती फांदीवर ठेवतो आणि नंतर परत येऊन खातो.
हे त्याचं “सर्व्हायव्हल स्किल” आहे. जंगलात टिकून राहण्यासाठी बिबट्याने ही पद्धत विकसित केली आहे.
बिबट्याला शिकार मिळवायला खूप मेहनत घ्यावी लागते. ती सहज गमावणं त्याला परवडत नाही. म्हणून झाडावर नेऊन खातो.