ऊसाच्या रसात लिंबू आणि अननस का घालतात? तुम्हाला माहितेय का?

पुढारी वृत्तसेवा

ऊसाचा रस

ऊसाचा रस घेताना तुम्ही पाहिलंय का की, त्यात लिंबू आणि अननस घालतात. यामागे काय कारण आहे.

Sugarcane Juice | Pudhari

अननसमध्ये काय असतं?

लिंबू आणि अननस दोन्ही पचनास मदत करतात. अननसामध्ये 'ब्रोमेलेन' नावाचे एन्झाइम असते जे प्रथिने पचवण्यास मदत करते. तर लिंबू पचनसंस्थेतील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतं.

Sugarcane Juice | Pudhari

अननस पचन सुधारतो

ऊस शरीराला थंडावा देतो. अननस पचन सुधारतो. त्यामुळे दोघांचं मिश्रण हेल्दी असतं.

Sugarcane Juice | Pudhari

रोगप्रतिकारशक्ती वाढते

लिंबू आणि अननस हे दोन्ही घटक व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहेत, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

Sugarcane Juice | Pudhari

सूज कमी होते

अननसातील ब्रोमेलिन शरीरातील सूज कमी करतं. म्हणूनच जखम भरायला, अंगदुखी कमी व्हायला मदत होते.

Sugarcane Juice | Pudhari

हाडं आणि सांधे मजबूत होतात

अननसमध्ये मँगनीज भरपूर असतं. हे हाडांची घनता वाढवतं आणि सांधेदुखीत आराम देतं.

Sugarcane Juice | Pudhari

हृदयासाठीही फायदेशीर

अननसातील अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर कोलेस्टेरॉल कमी करायला मदत करतात. म्हणजे हृदयाचं आरोग्य सुधारतं.

Sugarcane Juice | Pudhari

वजन नियंत्रणात राहतं

अननस कमी कॅलरीजचं फळ आहे. फायबर जास्त असल्याने पोट भरल्यासारखं वाटतं. ऊसाच्या रसात घातल्यावर ऊर्जा मिळते, चरबी वाढत नाही.

Sugarcane Juice | Pudhari

पण जास्त खाल्लं तर...

अननस जास्त प्रमाणात खाल्ल्यास जिभेला खाज, ॲसिडिटी किंवा पोटदुखी होऊ शकते. म्हणून नेहमी मर्यादित सेवन करा.

Sugarcane Juice | Pudhari

मूत्रमार्गाच्या समस्यांवर उपाय

ऊसाचा रस हा नैसर्गिकरित्या लघवी साफ होण्यास मदत करतो. त्यात लिंबू घातल्याने लघवीच्या जागी होणारी जळजळ किंवा यूटीआय सारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

Sugarcane Juice | Pudhari

रोज कोकम सरबत पिल्यास काय होतं?

kokum sharbat | Pudhari
येथे क्लिक करा