रोज कोकम सरबत पिल्यास काय होतं?

Rahul Shelke

कोकम सरबत

उन्हाळ्यात शरीरात उष्णता वाढते, डिहायड्रेशनचा धोका असतो. अशा वेळी कोकम सरबत नैसर्गिक थंडावा देत शरीराला आराम देतो.

kokum sharbat | Pudhari

नैसर्गिक पेय

कोकम शरीरातील उष्णता कमी करतं. उष्माघातापासून संरक्षण मिळवण्यासाठी हे एक प्रभावी घरगुती पेय आहे.

kokum sharbat | Pudhari

पचनासाठी उत्तम

अॅसिडिटी, गॅस, अपचन यांसारख्या समस्यांवर कोकम गुणकारी आहे. जेवणानंतर कोकम सरबत घेतल्यास पचन सुधारते.

kokum sharbat | Pudhari

डिहायड्रेशनपासून बचाव

घामामुळे शरीरातील पाणी कमी होते. कोकम सरबत इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यास मदत करते.

kokum sharbat | Pudhari

वजन नियंत्रणात ठेवतं

कोकममध्ये हायड्रॉक्सिसिट्रिक ॲसिड (HCA) असते. हे चरबी कमी करण्यास आणि भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतं.

kokum sharbat | Pudhari

हृदयासाठी फायदेशीर

कोकम बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

kokum sharbat | Pudhari

त्वचा आणि रोगप्रतिकारशक्ती

कोकममध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्वचा चांगली राहते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.

kokum sharbat | Pudhari

पित्त कमी करण्यास मदत

उन्हाळ्यात पित्त वाढल्याने चिडचिड, उलट्या, जळजळ होऊ शकते. कोकम शरीरातील पित्त संतुलित ठेवतं.

kokum sharbat | Pudhari

पण अति सेवन करु नका

कोकमचे अतिसेवन केल्यास पोटदुखी किंवा जुलाब होऊ शकतात. मधुमेह किंवा रक्तदाब असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

kokum sharbat | Pudhari

आरोग्यासाठी फायदेशीर

उन्हाळ्यात कोकम सरबत हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मर्यादित प्रमाणात घेतल्यास शरीराला थंडावा मिळतो.

kokum sharbat | Pudhari

छत्रपती शिवाजी महाराजांनी किती किल्ले बांधले होते? आकडा वाचून थक्क व्हाल!

Shivaji Maharaj | Pudhari
येथे क्लिक करा