अविनाश सुतार
एसीमुळे थंडावा मिळतो, पण त्याचे काही दुष्परिणाम आरोग्यावरही होऊ शकतात. यावर घरगुती उपाय म्हणजे एसी रूममध्ये एक पाण्याची बादली ठेवणे
एसी रूममध्ये पाण्याची बादली ठेवल्यामुळे एसीमुळे निर्माण होणारा कोरडेपणा कमी होतो, एसी हवेतील उष्णता आणि आर्द्रता शोषून घेतो. त्यामुळे खोलीतील हवा खूप कोरडी बनते
एसीतील कोरडेपणामुळे त्वचा सुकणे, ओठ फुटणे, डोळ्यांना खाज येणे, तसेच घशात आणि नाकात कोरडेपणा निर्माण होऊन त्रास होतो
सायनसचा त्रास असणाऱ्यांना आणि श्वसनासंबंधी आजार असणाऱ्यांना हा कोरडेपणा अधिक त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे पाण्याची बादली ठेवल्याने फायदा होतो
पाण्याची बादली ही एक नैसर्गिक ह्युमिडिफायर म्हणून काम करते. पाण्याचे अंशत: बाष्पीभवन होत राहते आणि त्यामुळे खोलीतील आर्द्रता नैसर्गिक पातळीवर टिकून राहते
या आर्द्रतेमुळे त्वचेतील ओलावा टिकतो, श्वसनास सुलभता मिळते आणि झोपही अधिक शांत होते. हे बाष्पीभवन हळूहळू आणि नैसर्गिकरित्या होते. इलेक्ट्रॉनिक ह्युमिडिफायरपेक्षा अधिक सुरक्षित असते
हवेत कमी आर्द्रता शरीरासाठी आणि वस्तूंसाठीही हानिकारक असते. लाकडी फर्निचरला तडे जाऊ शकतात, तर झाडे कोमेजू शकतात. पाण्याची बादली ठेवल्याने कोरडेपणा कमी होतो
एसी रूममधील कोरड्या हवेमुळे घशात कोरडेपणा येणे किंवा नाक बंद होते, खोलीत पाण्याद्वारे ओलावा निर्माण केल्यास नैसर्गिक वातावरणात झोपू लागू शकते
पाण्याची बादली खोलीच्या कोपऱ्यात किंवा खिडकीजवळ ठेवा, पाण्यात काही थेंब एसेंशियल ऑईल किंवा लिंबाच्या साली टाकल्यास खोलीत प्रसन्न सुगंध येतो