पुढारी वृत्तसेवा
प्रदूषित हवा, अशुद्ध पाणी इत्यादींमधील विविध जंतूमुळे तसेच 'हर्पिस'च्या विषाणूमुळे फंगल इंफेक्शनमुळे काहीवेळा तोंड येते
तोंड आले असताना खाताना आग होत असल्यामुळे आहार कमी होतो
ज्यांना वारंवार तोंड येण्याची सवय असते. अशा व्यक्तींना आहार कमी जातो. यामुळे पोषण कमी होते
अशक्तपणा वाटतो. वजन उतरते. प्रतिकारशक्ती कमी झाल्याने आलेले तोंड बरे होत नाही
काही व्यक्तीमध्ये जंतुसंसर्गामुळे मुखदुर्गंधी वाढलेली असते. तसेच घशाला सूज येऊ शकते
तोंड आलेले असतानाही मिशरी, तंबाखू, पान, गुटखा इत्यादी सतत चालू ठेवल्यास गरा पडतो
सतत तोंड आल्याने जखम होऊन कॅन्सर होण्याचा धोका वाढतो
आहारामध्ये ताजे ताक, तूप, मोरावळा, लिंबू-सरबत, कोकम सरबत, डाळिंब, कोहळ्याच्या, नारळाच्या नाचणीसत्व यासारख्या थंड पदार्थांचा वापर करावा
रक्तातील उष्णता कमी करणारी, प्रतिकारशक्ती वाढविणारी, पित्तशमन करणारी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत