Rahul Shelke
दरवर्षी जानेवारीत घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ होते. या ट्रेंडला जगभरात 'Divorce Month' असं म्हटलं जातं.
नवीन वर्ष म्हणजे नवी सुरुवात असते. लोक आयुष्य, नातेसंबंध आणि भविष्याविषयी विचार करू लागतात.
अभ्यासानुसार जानेवारीत इतर महिन्यांच्या तुलनेत घटस्फोटाच्या अर्जांमध्ये 30 टक्क्यांहून अधिक वाढ होते.
डिसेंबरनंतर अचानक “Divorce”, “Separation”, “Lawyer” असे शब्द सर्च करणाऱ्यांचे प्रमाण वाढते.
सणासुदीचा काळ आनंदाचा वाटतो, पण आर्थिक ताण, नातेसंबंधातील दबाव आणि कामामुळे
नात्यांवरचा ताण वाढतो.
अनेक जोडपी मुलांसाठी किंवा समाजासाठी सणासुदीपर्यंत ताण सहन करतात. जानेवारीत मात्र निर्णय घेतला जातो.
अभ्यास सांगतो की, जानेवारीत घटस्फोटाचा निर्णय अनेकदा महिलांकडून घेतला जातो.
वर्षअखेर बोनस, कर नियोजन, विमा यामुळे जानेवारीत निर्णय घेणं सोपं वाटतं.
जानेवारीत लोकांच्या मनावरचा ताण वाढतो. घाईत निर्णय न घेता संवाद, समुपदेशन गरजेचं, असं तज्ज्ञांचं मत आहे.