पुढारी वृत्तसेवा
फक्त दागिना नाही, तर परंपरा, श्रद्धा आणि सुरक्षिततेचं प्रतीक आहे सोनं
भारतीय लग्न म्हटलं की सोनं आलंच! वधूचा साज, कुटुंबाचा मान आणि शुभ संकेतांच प्रतीक म्हणून सोन्याला विशेष स्थान आहे.
हिंदू धर्मात सोन्याला माता लक्ष्मी आणि सूर्यदेवाशी जोडलं जातं. लग्नात सोनं घातल्याने नव्या आयुष्यात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे.
भारतीय परंपरेनुसार नववधूला घरची लक्ष्मी मानलं जातं. त्यामुळे तिला सोन्याचे दागिने देणं शुभ आणि मंगल मानलं जातं.
पूर्वी महिलांना मालमत्तेचे हक्क कमी होते. त्यामुळे लग्नात मिळालेलं सोनं हे तिचं आर्थिक संरक्षण मानलं जात होतं.
सोनं कधी गंजत नाही, खराब होत नाही. म्हणूनच लग्नाच्या नात्यासारखं ते दीर्घकाळ टिकणारं आणि मजबूत मानलं जातं.
अनेक कुटुंबं मुलीच्या जन्मापासून थोडं-थोडं सोनं खरेदी करतात. लग्नावेळी ते पालकांच्या प्रेम आणि मेहनतीचं प्रतीक बनतं.
काही संशोधनांनुसार, सोनं शरीराचं तापमान संतुलित ठेवण्यास मदत करू शकतं आणि प्रतिकारशक्तीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
भारतामध्ये सोनं सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं. गरज पडल्यास ते विकता किंवा तारण ठेवता येतं.
भारतीय लग्नांमध्ये सोनं म्हणजे श्रद्धा, परंपरा, प्रेम, सुरक्षितता आणि भविष्यातील आधार यांचं सुंदर मिश्रण आहे.