पुढारी वृत्तसेवा
वाढती उष्णता आणि दमट हवामानामुळे शरीरावर नेमका काय परिणाम होतो, जाणून घ्या.
कडक ऊन, वाढतं तापमान आणि प्रचंड उकाडा यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता वाढते. थकवा, चक्कर, डोकेदुखी आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या सुरू होतात.
सामान्यतः आपल्या शरीराचं तापमान सुमारे 37°C असतं. बाहेर तापमान वाढलं की शरीर घाम बाहेर फेकतं, जेणेकरून शरीर थंड राहावं.
फक्त उष्णता नाही, तर आर्द्रता (Humidity) सुद्धा धोकादायक असते. हवा दमट असेल तर घाम येत नाही आणि शरीर थंड होणं थांबतं.
वैज्ञानिकांच्या मते 35°C Wet-Bulb Temperature ही माणसाच्या शरीराची शेवटची मर्यादा मानली जाते. याचा अर्थ साधारण 46°C उष्णता + जास्त आर्द्रता असेल तर परिस्थिती जीवघेणी ठरू शकते.
शरीर स्वतःला थंड ठेवण्यात अपयशी ठरतं. आतलं तापमान वाढत जाऊन 40°C च्या वर गेलं तर उष्माघात होण्याचा धोका वाढतो.
अत्यंत उष्णतेत हृदय त्वचेकडे जास्त रक्त पाठवतं. त्यामुळे Blood Pressure अचानक कमी होऊ शकतं आणि किडनी, लिव्हरला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही.
संशोधनानुसार, फक्त गरम हवा नव्हे तर गरम + दमट वातावरण अधिक घातक ठरतं. अगदी तरुण आणि फिट लोकांनाही यात त्रास होऊ शकतो.
अचानक चक्कर येणं, खूप घाम येणं किंवा घाम थांबणं, मळमळ, गोंधळल्यासारखं वाटणं, श्वास घेण्यास त्रास ही उष्माघातची सुरुवातीची लक्षणं असू शकतात.
पुरेसं पाणी प्या, उन्हात कमी जा, हलके कपडे घाला आणि दमट हवामानात जास्त वेळ बाहेर राहणं टाळा. लक्षात ठेवा: उष्णता फक्त त्रासदायक नाही, ती जीवघेणीही ठरू शकते!