Digestive Health : आहारात पुरेसे फायबर का असावे?

पुढारी वृत्तसेवा

आहारात फायबर पचनास मदत करण्‍याबरोबरच हृदयाचे आरोग्य आणि निरोगी आतड्यांतील सूक्ष्मजीवांसाठी एक महत्त्वाचे इंधन आहे.

आहारात दररोज फक्त १० ग्रॅम फायबर वाढवल्याने जीवघेण्या हृदयरोगाचा धोका १०-१५% कमी होतो.

उच्च फायबरयुक्त आहार शॉर्ट-चेन फॅटी ॲसिड (SCFAs) तयार करणाऱ्या जीवाणूंना समृद्ध करतो. ते शरीरातील सूज कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते.

फायबर साखरेचे शोषण मंदावते. यामुळे इन्सुलिनची पातळी अचानक वाढण्यास प्रतिबंध होतो.

फायबरमुळे पोट भरल्याची भावना वाढते. यामुळे नैसर्गिकरित्या कॅलरीचे सेवन कमी होऊन दीर्घकालीन वजन व्यवस्थापनास मदत होते.

weight loss tips without gym | Canva

उच्च फायबर सेवनाचा संबंध कोलोरेक्टल आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो, असे संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे.

फायबरच्या किण्वन प्रक्रियेमुळे आतड्यांच्या आरोग्‍य सुधारते. रोगप्रतिकारशक्तीचे नियमन आणि एकूण आरोग्य सुधारते.

फायबरने समृद्ध आहाराचा संबंध सर्व आरोग्यविषयक समस्यांमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी करण्याशी, विशेषतः हृदयाच्‍या आरोग्‍याशी जोडलेला आहे.

येथे क्‍लिक करा.