पुढारी वृत्तसेवा
सकाळी कोमट पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते.
कोमट पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते.
सकाळी लवकर कोमट पाणी पिल्याने शरीराला अधिक कार्यक्षमतेने कॅलरीज जाळण्यास मदत होऊ शकते.
आतड्यांच्या आरोग्य सुधारुन बद्धकोष्ठतेपासून आराम देते.
ऑक्सिजन आणि पोषक तत्वे शरीरात अधिक चांगल्या प्रकारे पोहोचतात.
पचनसंस्थेला आराम देऊन पोट फुगणे आणि गॅसचा त्रास कमी करते.
कोमट पाणी पोट भरल्याची भावना निर्माण करते. त्यामुळे अति खाणे कमी होवून वजन आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
थंडीच्या दिवसात सर्दी किंवा ॲलर्जीसाठी कोमटपाणी उपयुक्त ठरते.
शरीरातील पाण्याची पातळी सुधारल्याने त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
टीप : ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. कोणत्याही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.