Rahul Shelke
चीनमध्ये सध्या उदास चेहऱ्याच्या घोड्याचं खेळणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
17 फेब्रुवारी 2026 पासून चीनमध्ये घोड्याचं वर्ष सुरू होत आहे. सगळीकडे आनंदी, रंगीत घोडे असताना हा उदास घोडा ट्रेंड होतोय.
हा घोडा चीनमधील यिवू इंटरनॅशनल ट्रेड सिटी येथे बनवण्यात आला. येथे जगभरात पाठवली जाणारी खेळणी आणि वस्तू तयार होतात.
हा घोडा मुद्दाम उदास बनवलेला नव्हता. फॅक्ट्रीत चुकून तोंड उलटं शिवलं गेलं आणि चेहरा उदास दिसू लागला.
हा उदास घोडा सोशल मीडियावर दिसताच लोकांना तो आवडू लागला. लोक म्हणू लागले “हा तर अगदी आपल्यासारखाच आहे!”
चीनमधील तरुण कर्मचारी या घोड्याला थकलेलं, तणावग्रस्त, आतून तुटलेला याचं प्रतीक मानत आहेत.
मिम्समध्ये हा घोडा बाहेरून शांत, पण आतून त्रस्त आहे. कॉर्पोरेट कर्मचाऱ्याचा चेहरा म्हणून तो दाखवला जातो.
चीनमध्ये अनेक कर्मचारी सकाळी 9 ते रात्री 9, आठवड्यात 6 दिवस काम करतात. हा उदास घोडा या व्यवस्थेविरोधातील मूक निषेधाचं प्रतिक बनला आहे.
चीनमध्ये सध्या थोडीशी विचित्र, अपूर्ण, उदास पण गोड दिसणारी खेळणी तरुणांमध्ये जास्त लोकप्रिय होत आहेत.
2026 हे घोड्याचं वर्ष असल्याने घोड्याच्या थीमची मागणी वाढली आहे. त्यामुळे हा उदास घोडा आता नवीन वर्षाचं खास प्रतीक बनला आहे.