Rahul Shelke
रेकॉर्ड दरावर पोहोचलेली चांदी अचानक कोसळली आहे. एका झटक्यात चांदीचे दर तब्बल 60 हजार रुपयांनी घसरले.
29 जानेवारी रोजी चांदीने 4 लाख प्रतिकिलोचा टप्पा ओलांडला होता. आज मात्र चित्र पूर्णपणे बदललं आहे.
MCX वर चांदीच्या दरात 15 टक्क्यांची थेट घसरण झाली. इतकी घसरण झाल्याने लोअर सर्किट लागू झाला.
चांदीचा दर आता ₹3,39,910 प्रति किलो इतका खाली आला आहे. एका दिवसात जवळपास ₹60 हजारांची घसरण झाली.
कालचा उच्चांक होता ₹4,20,048 प्रति किलो. त्या तुलनेत आज चांदी सुमारे ₹80 हजारांनी स्वस्त झाली आहे.
इतक्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत, बाजारात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.
तज्ज्ञांच्या मते नफावसुली, कमोडिटी मार्केटमधील प्रचंड चढ-उतार आणि जागतिक घडामोडी
यामुळे चांदीच्या भावात घसरण झाली.
तज्ज्ञांचा सल्ला आहे की, घाईघाईने निर्णय न घेता, मार्केट स्थिर होईपर्यंत वाट पाहणं योग्य ठरेल. गुंतवणूकदारांनी सल्लागाराचा सल्ला घेतल्या शिवाय गुंतवणूक करु नये.
चांदीत पुढील काही दिवसमोठी अस्थिरता, तीव्र चढ-उतार पाहायला मिळू शकतात, असा अंदाज आहे.