Rahul Shelke
जगात कुठल्याही हॉटेलमध्ये जा पंचतारांकित असो किंवा साधं हॉटेल, खाटेवरची चादर हमखास पांढरीच असते.
पांढरा रंग हा स्वच्छतेचा रंग आहे असं म्हणलं जातं. हॉस्पिटलमध्येही पांढराच रंग असतो.
पांढऱ्या चादरीवर छोटासा डागही लगेच दिसतो.
निळ्या, करड्या किंवा इतर रंगांच्या चादरीवरचे डाग दिसून येत नाहीत
हॉटेल स्टाफला डाग दिसणं गरजेचं असतं. पांढरी चादर खराब असेल तर ती लगेच बाजूला काढता येते.
पांढऱ्या चादरी एकत्र धुता येतात. ब्लिच, गरम पाणी वापरता येतं. रंग जाण्याची भीती नसते, पैसा आणि वेळ वाचतो.
पांढऱ्या चादरी प्रकाश परावर्तित करतात. खोली मोठी, स्वच्छ आणि महागडी वाटते.
लक्झरीचा हा फॉर्म्युला आहे.
डिझाइनची आवड-निवड बदलू शकते. पण पांढरा रंग कुणालाच खटकत नाही.
हॉटेलसाठी ही 'सेफ चॉइस' आहे.
पांढरी चादर पाहून लोक जपून वापरतात. मेकअप आणि काही खायचं असेल तर काळजी घेतली जाते.