Rahul Shelke
आजही जगभरात लाखो मुलींचं 18 वर्षांआधी लग्न लावलं जातं.
2025 च्या आकडेवारीनुसार नाइजर देशात सर्वाधिक बालविवाह होतात.
नाइजरमध्ये 76% मुलींचं 18 वर्षांआधीच लग्न होतं.
नाइजरमध्ये तब्बल 28% मुलींचं 15 वर्षांआधीच लग्न लावलं जातं.
नाइजरमध्ये मुलींचं लग्न कायद्यानेच 15 व्या वर्षी परवानगीने होतं.
गरीबी, शिक्षणाचा अभाव आणि सामाजिक परंपरा यामुळे बालविवाहाच प्रमाण जास्त आहे.
सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, चाड आणि मालीमध्येही बालविवाह मोठ्या प्रमाणात होतात.
टक्केवारी कमी असली तरी संख्या मात्र प्रचंड आहे.
भारतामध्ये सुमारे 22 कोटींहून अधिक बालवधू आहेत.
जगातील प्रत्येक तीन बालवधूंमध्ये एक मुलगी भारतात राहते.