Honey Durability: मध हजारो वर्षे देखील खराब का होत नाही?

Anirudha Sankpal

दीर्घकाळ टिकण्याचे रहस्य

योग्य पद्धतीने साठवलेले शुद्ध मध कधीही खराब होत नाही; यामागे निसर्गासोबतच विज्ञान आहे.

Side effects of honey

कमी ओलावा

मधात पाण्याचे प्रमाण अवघे १७ ते २०% असल्याने जिवाणू आणि बुरशीची वाढ होऊ शकत नाही.

साखरेचे प्रमाण

मधातील अतिप्रमाणातील साखर सूक्ष्मजीवांमधील पाणी खेचून घेते, ज्यामुळे ते जिवंत राहत नाहीत.

आम्लीय गुणधर्म (Acidic Nature)

मधाचा pH साधारण ३.२ ते ४.५ असतो; हे आम्लीय वातावरण बॅक्टेरियांसाठी प्रतिकूल ठरते.

नैसर्गिक संरक्षक

मधमाशांच्या लाळेतील एन्झाइम्समुळे मधात 'हायड्रोजन पेरॉक्साइड' तयार होते, जे नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल म्हणून काम करते.

खराब होण्याची कारणे

मधात बाहेरील पाणी किंवा ओलावा गेल्यास आणि भांडे उघडे राहिल्यास ते खराब होऊ शकते.

भेसळयुक्त मध

बाजारातील भेसळयुक्त किंवा अतिरिक्त साखर मिसळलेले मध लवकर खराब होण्याची शक्यता असते.

निष्कर्ष

हवाबंद भांड्यात ठेवलेले १००% शुद्ध मध हजारो वर्षे सुरक्षित राहू शकते.

येथे क्लिक करा