Winter Heart Attack Risk: थंडीत हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढतं?

Anirudha Sankpal

थंडीमुळे शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी रक्तवाहिन्या अरुंद होतात.

रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे रक्तप्रवाह अडथळ्यांसह पुढे जातो आणि रक्तदाब (Blood Pressure) वाढतो.

वाढलेल्या रक्तदाबामुळे हृदयाला जास्त रक्त पंप करावे लागते, ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो.

थंड हवामानात रक्ताची घनता (Viscosity) वाढते, ज्यामुळे रक्त थोडे घट्ट होते.

रक्त घट्ट झाल्याने रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या (Blood Clots) तयार होण्याची शक्यता वाढते.

थंडीमुळे लोक घराबाहेर कमी पडतात, ज्यामुळे शारीरिक हालचाल कमी होते आणि वजन वाढते.

थंडीत, विशेषतः सकाळी, अचानक जड काम किंवा व्यायाम केल्यास हृदयावर ताण येतो.

हिवाळ्यात फ्लू किंवा न्यूमोनियासारखे संसर्ग वाढतात, ज्यामुळे हृदयाच्या कार्यावर नकारात्मक परिणाम होतो.

सूर्यप्रकाश कमी मिळाल्याने व्हिटॅमिन-डी ची पातळी घटते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य कमकुवत होते.

येथे क्लिक करा