Coconut Water: नारळ पाणी 'या' ७ लोकांच्या जीवावर बेतू शकतं

Anirudha Sankpal

नारळ पाणी हे अमृतासमान मानलं जातं. उत्तम आरोग्यासाठी नारळ पाणी पिण्याचा सल्ला अनेकजण देतात.

मात्र हेच नारळपाणी काही लोकांसाठी अमृताचं नाही तर विषाचं काम करू शकतात. जाणून घेऊयात कोणासाठी नारळ पाणी वर्ज्य आहे.

किडनीचा त्रास असलेले लोक

नारळ पाण्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. किडनी निकामी झाल्यावर ती या अतिरिक्त पोटॅशियमला फिल्टर करू शकत नाही. शरीरात पोटॅशियमचे प्रमाण वाढल्यास हृदयाची लय (Heart Rhythm) बिघडू शकते.

मधुमेहाचे रुग्ण

नारळ पाण्यामध्ये नैसर्गिक साखर असते. जास्त प्रमाणात प्यायल्यास, यामुळे रक्तातील साखर (Blood Sugar) वाढू शकते.

शस्त्रक्रिया होणार असलेले रुग्ण

नारळ पाण्यामुळे इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन (Electrolyte Imbalance) बिघडू शकते. या असंतुलनाचा परिणाम भूल (Anesthesia) देण्यावर होऊ शकतो. शस्त्रक्रिया होण्याच्या किमान २ आठवडे आधी नारळ पाणी पिणे बंद करण्याचा सल्ला दिला जातो.

कमी रक्तदाब असलेले लोक

नारळ पाणी रक्तदाब आणखी कमी करते. यामुळे चक्कर येणे किंवा थकवा जाणवण्याची समस्या वाढू शकते.

नारळाची ॲलर्जी असलेले

ज्यांना नारळाची ॲलर्जी आहे, त्यांना नारळ पाणी प्यायल्यावर त्वचेवर पुरळ, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा ॲलर्जीची तीव्र प्रतिक्रिया (Reaction) येऊ शकते त्यांनी नारळ पाणी घेणे टाळावे.

सतत लघवीला जावे लागणारे

नारळ पाणी हे नैसर्गिक मूत्रवर्धक (Natural Diuretic) आहे, म्हणजे ते लघवीचे प्रमाण वाढवते. ज्यांना आधीच वारंवार लघवीला जावे लागते, त्यांची ही समस्या वाढू शकते.

वजन वाढवण्यासाठी प्रयत्नशील असलेले

नारळ पाणी हे कमी-कॅलरीचे (Low-Calorie) पेय आहे. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी लागणारी पुरेशी ऊर्जा (Energy) यातून मिळत नाही.

येथे क्लिक करा