पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्यात हवेत ओलावा जास्त असल्याने स्कॅल्प तेलकट होतो. त्यामुळे केसांची मुळे कमकुवत होऊन केस गळू शकतात.
दमट वातावरणामुळे बुरशी आणि कोंड्याची समस्या वाढण्याची शक्यता असते, ज्याचा परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो.
पावसाच्या पाण्यात धूळ, प्रदूषण आणि इतर अशुद्ध घटक असू शकतात. त्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात.
ओले केस बांधल्याने मुळांवर ताण येतो आणि केस तुटण्याची शक्यता वाढते.
हंगाम बदलताना शरीरातील काही नैसर्गिक बदलांमुळेही केसगळती तात्पुरती वाढू शकते.
प्रथिने, लोह, झिंक आणि बायोटीनची कमतरता असल्यास केस अधिक प्रमाणात गळू शकतात.
मानसिक तणाव आणि अपुरी झोप यांचाही केसांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
नियमित केस धुणे आणि स्कॅल्प स्वच्छ ठेवणे केसगळती कमी करण्यास मदत करू शकते.
संतुलित आहार, योग्य हेअर केअर आणि पुरेशी झोप यामुळे केस निरोगी राहण्यास मदत मिळते