पुढारी वृत्तसेवा
उन्हाळा सुरू झाला की हायवे आणि शहरांमध्ये ‘सरकारमान्य’ असा बोर्ड लावलेली नीरा विक्रीची टपरी दिसायला लागते. पण हा शब्द नेमका कशासाठी?
अनेकांना वाटतं नीरा म्हणजे ताडीचाच प्रकार. म्हणूनच सरकारची परवानगी लागते. पण प्रत्यक्षात नीरा आणि ताडी वेगळ्या गोष्टी आहेत.
नारळ किंवा ताडीच्या झाडाच्या फुलोऱ्याला छोटं छिद्र पाडलं जातं. त्यातून पाण्यासारखं द्रव बाहेर पडतं. हे द्रव म्हणजे नीरा.
नीरेत नैसर्गिक साखर असते. काही तासांनी ती आंबते आणि तिचं ताडीत रूपांतर होतं. ताडी ही मद्य समजली जाते.
नीरा विक्रीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग परवानगी देतो. फक्त नोंदणीकृत सोसायट्यांनाच विक्रीची परवानगी असते.
नीरा काढल्यापासून 24 तासांत वापरावी लागते. 4°C तापमानात सीलबंद केल्यास जास्त काळ विक्री करता येते. पूर्वी 15 किमी अंतराचा नियम होता, तो रद्द झाला आहे.
कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डकडे नोंदणी असलेले उत्पादकच नीरा काढू शकतात. उत्पादन शुल्क विभाग सतत तपासणी करतो.
डिहायड्रेशन कमी होते, उर्जा मिळते, कॅल्शियम, मिनरल्स, फॉस्फरस मिळते, उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळतो.
तज्ज्ञांच्या मते, नीरा नैसर्गिक पेय आहे. मात्र 6 तासांपेक्षा जास्त ठेवल्यास ती आंबू शकते. खात्रीशीर आणि ताजी नीरा पिणे फायद्याशीर आहे.