पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांत अनेक विमान अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
आकडेवारीनुसार हवाई प्रवास रस्त्यापेक्षा सुरक्षित आहे. पण विमान आणि हेलिकॉप्टरमधील रिस्क लेव्हल वेगळी असते.
विमान: दर १ लाख उड्डाण तासांमागे सुमारे 7.28 अपघात होतात. तर हेलिकॉप्टर: दर १ लाख उड्डाण तासांमागे 9.84 अपघात होतात. म्हणजे हेलिकॉप्टरचा अपघात दर सुमारे 35% जास्त
मोठ्या कमर्शियल जेटमध्ये मृत्यूची शक्यता फारच कमी असते. Air India आणि IndiGo सारख्या एअरलाइन्स स्वतंत्र हाय-सेफ्टी कॅटेगरीत येतात.
कारण क्लिष्ट रोटर सिस्टम, कमी उंचीवरील उड्डाण, इमारती, डोंगर यांच्याजवळून प्रवास, हवामान बदल.
इंजिन बंद पडलं तरी हवा रोटर फिरवत राहते. वाईट परिस्थितीत पायलट कंट्रोल्ड इमर्जन्सी लँडिंग करू शकतो.
रांचीतील एअर अॅम्ब्युलन्स अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. अंदमानमध्ये पवन हंस हेलिकॉप्टरने समुद्रात सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग केली यातील सर्व प्रवासी वाचले.
आकड्यांनुसार हेलिकॉप्टर जास्त धोकादायक आहे. तर सर्वात सुरक्षित मोठी कमर्शियल विमाने आहेत.