Rahul Shelke
CAPTCHA म्हणजे एक डिजिटल टेस्ट असते. ती प्रत्येक वेबसाइटवर येते. समोर खरा माणूस आहे की बॉट (ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर) आहे हे ओळखण्यासाठी ही टेस्ट असते. बॉट्सचा वापर फसवणूक, स्पॅम आणि डेटा चोरीसाठी होतो.
दर सेकंदाला लाखो बॉट्स इंटरनेटवर फिरत असतात. हे बॉट्स फेक अकाउंट बनवतात,
स्पॅम पसरवतात, वेबसाइट स्लो करतात, डेटा चोरण्याचा प्रयत्न करतात. CAPTCHA हे त्यांच्याविरुद्धच सुरक्षा कवच आहे.
जर CAPTCHA नसेल तर कोणीही हजारो वेळा लॉगिन ट्राय करू शकतो,फॉर्म स्पॅम करू शकतो, तुमचं अकाउंट हॅक होऊ शकतं. म्हणजे CAPTCHA हा तुमच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा आहे.
CAPTCHA तुमचं माऊस हलवणं, क्लिक करण्याची पद्धत, ब्राउझिंग स्टाईल हे सगळं पाहून ठरवतं तुम्ही माणूस आहात की नाही. कधी फक्त I’m not a robot वर क्लिक केलं तरी पुरेसं असतं.
आज जगात सर्वाधिक वापरलं जाणारं reCAPTCHA हे Google ने विकसित केलं आहे. हे सिस्टम मागे बसून तुमचं निरीक्षण करत असतं आणि सेकंदात निर्णय घेतं.
हो. तो खूप त्रासदायक आहे. पण कल्पना करा CAPTCHA नसतं तर? ऑनलाइन फसवणूक कितीतरी पटींनी वाढली असती.
CAPTCHA फक्त “तुम्ही माणूस आहात” हे तपासत नाही. त्याचं खरं काम आहे इंटरनेट सुरक्षित ठेवणं, स्पॅम रोखणं, सायबर क्राइम कमी करणं. ही छोटी टेस्ट मोठ्या संकटांपासून वाचवते.
चिडू नका असं समजा ते तुमच्यासाठीच काम करतंय. कारण CAPTCHA म्हणजे तुमची डिजिटल सुरक्षा.