shreya kulkarni
आरोग्यदायी समजली जाणारी अंडी या ऋतूत आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. जाणून घ्या ८ मोठी कारणं.
पचनशक्तीवर ताण पावसाळ्यात आपली पचनक्रिया नैसर्गिकरित्या मंदावलेली असते. अंडी पचायला जड असल्याने पोटदुखी, गॅस किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो.
जिवाणू संसर्गाचा धोका दमट हवामानामुळे अंड्याच्या कवचावर 'साल्मोनेला' (Salmonella) सारखे जिवाणू वेगाने वाढतात. यामुळे फूड पॉयझनिंगचा धोका अनेक पटींनी वाढतो.
शरीरात उष्णता वाढते अंड्यांची प्रकृती उष्ण असते. पावसाळ्यात जास्त अंडी खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढते, ज्यामुळे त्वचेवर पुरळ, मुरुमे किंवा फोड येऊ शकतात.
कमकुवत प्रतिकारशक्ती पावसाळ्यात आपली प्रतिकारशक्ती (Immunity) आधीच कमजोर असते. अशावेळी पचायला जड पदार्थ खाल्ल्याने शरीरावर अतिरिक्त ताण येतो आणि आजारी पडण्याची शक्यता वाढते.
अंडी लवकर खराब होतात पावसाळ्यातील दमट आणि बदलत्या तापमानामुळे अंडी लवकर खराब होऊ शकतात. नकळतपणे खराब झालेले अंडे खाणे आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.
ॲलर्जीचा धोका वाढतो कमकुवत पचन आणि प्रतिकारशक्तीमुळे काही लोकांना पावसाळ्यात अंड्याची ॲलर्जी होण्याची किंवा आहे ती वाढण्याची शक्यता असते. यामुळे त्वचेवर खाज किंवा पुरळ येऊ शकते.