Moringa Leaves Benefits | पावसाळ्यापूर्वी शेवग्याच्या पानांची भाजी का खावी?

पुढारी वृत्तसेवा

शेवग्याच्या (ड्रमस्टिक/मोरिंगा) झाडाची पाने ही अत्यंत पौष्टिक मानली जातात

ग्रामीण भागात शेवग्याच्या पानांची भाजी, सूप, पराठे किंवा पावडरच्या स्वरूपात सेवन केले जाते.

शेवग्याला अनेकदा "सुपरफूड" असेही म्हटले जाते कारण त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात

शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन A आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होण्यास मदत होते

काही संशोधनांनुसार शेवग्याच्या पानांतील जैवसक्रिय घटक रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात. मधुमेहींसाठी फायदेशीर ठरते

पानांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे हाडे आणि दात मजबूत राहण्यास मदत होते

शेवग्याच्या पानांमध्ये लोह (आयर्न) भरपूर असते. नियमित सेवन केल्यास हिमोग्लोबिन वाढविण्यास मदत होऊ शकते

अँटिऑक्सिडंट्स आणि वनस्पतीजन्य संयुगे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते

शेवग्याच्या पानांमध्ये दाहरोधक (Anti-inflammatory) गुणधर्म असतात. त्यामुळे सांधेदुखी किंवा शरीरातील सूज कमी करण्यास मदत होऊ शकते

येथे क्लिक करा