Milk Benefits | लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत: कोणाला किती दूध आवश्यक?

पुढारी वृत्तसेवा

दूध हे प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन B12, रिबोफ्लेविन, फॉस्फरस आणि अनेक पोषक घटकांचे चांगले स्रोत आहे

वय, आरोग्य, आहारपद्धती, शारीरिक हालचाल आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन यावर प्रत्येक व्यक्तीचे आहारात दूध घेण्याचे अवलंबून असते

लहान मुले (१–३ वर्षे) दिवसाला सुमारे २ कप (४००–५०० मि.ली.) दूध किंवा समतुल्य दुग्धजन्य पदार्थ घेऊ शकतात

शालेय मुले (४–८ वर्षे) दिवसाला २–२. ५ कप (५००–६०० मि.ली.) दूध घेण्याचे सरासरी प्रमाण असते

किशोरवयीन मुले-मुली (९–१८ वर्षे) - वाढत्या वयामुळे दिवसाला ३ कप (सुमारे ७५० मि.ली.) किंवा समतुल्य दुग्धजन्य पदार्थ घेणे आवश्यक असते

प्रौढ (१९–५९ वर्षे) साधारण २ कप (४००–५०० मि.ली.) दूध किंवा त्याच्या समतुल्य दही, ताक, पनीर इत्यादी पदार्थ घेणे गरजेचे आहे

गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी दिवसाला ५००–७५० मि.ली. दूध किंवा समतुल्य दुग्धजन्य पदार्थ घेणे गरजेचे आहे

ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांवरील) दिवसाला २–३ कप (५००–७५० मि.ली.) दूध घेणे हाडांचे आरोग्य टिकवण्यासाठी गरजेचे असते

सामान्यतः निरोगी प्रौढ व्यक्तीस दररोज ४००–५०० मि.ली. (सुमारे २ ग्लास) दूध किंवा त्याच्या समतुल्य दुग्धजन्य पदार्थ पुरेसे असतात

येथे क्लिक करा