पुढारी वृत्तसेवा
मनुस्मृती जाळण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक निर्णय होता
25 डिसेंबर 1927 महाड येथे ऐतिहासिक घटना घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले
हा फक्त ग्रंथ जाळण्याचा प्रसंग नव्हता तर अन्यायाविरुद्धचा आवाज होता. समाज बदलण्याची सुरुवात इथून झाली
जातिव्यवस्थेविरोधात आंबेडकरांनी बंड केले. मनुस्मृतीने जातीभेदाला मान्यता दिली होती, आंबेडकरांनी यालाच ठाम विरोध केला
अस्पृश्यांना माणूस म्हणूनही मान मिळत नव्हता, त्यामुळे हा अस्पृश्यतेविरुद्धचा लढा होता
मनुस्मृतीत महिलांवर अनेक बंधने घातली होती. या विचारसरणीला आंबेडकरांचा विरोध होता
समाजात समानता आणण्यासाठी हे पाऊल होते. मानवी हक्कांसाठी मोठी लढाई आंबेडकरांनी लढली
महाड येथे पाणी पिण्याच्या अधिकारासाठी आंदोलन केले होते
मनुस्मृती जाळणे म्हणजे अन्यायाच्या विचारांचा अंत
जातिव्यवस्था, अस्पृश्यता आणि स्त्रियांवरील अन्यायाच्या विरोधात हा प्रतीकात्मक निषेध होता. हा फक्त निषेध नव्हता तर समानतेच्या नव्या युगाची सुरुवात होती