पुढारी वृत्तसेवा
तुळजापूर मंदिराला किल्ल्यासारखी तटबंदी का आहे?
तुळजाभवानी मंदिर पाहताना एक गोष्ट लगेच लक्षात येते. मंदिराभोवती किल्ल्यासारखी भक्कम तटबंदी आहे. पण ही तटबंदी नेमकी का बांधली गेली?
मंदिर की छोटा किल्ला?
तुळजापूर मंदिराची रचना पाहिली तर ती एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी वाटते. बाहेरून भक्कम दगडी भिंती दिसतात. या भिंती मंदिराच्या संपूर्ण परिसराला वेढून आहेत.
तटबंदीचा इतिहास किती जुना?
तुळजापूर मंदिराची बाहेरील तटबंदी निंबाळकरांच्या काळात उभारली गेल्याचा उल्लेख आढळतो. ही तटबंदी जवळपास अडीचशे ते तीनशे वर्ष जुनी असल्याचे सांगितले जाते. तिच्याशी संबंधित उल्लेख कागदपत्रांमध्येही आढळतात.
मंदिराभोवती तटबंदी का?
मंदिराच्या बाहेर तटबंदी उभारण्याची परंपरा नवीन नाही. प्राचीन आणि मध्ययुगीन काळातही अशी रचना पाहायला मिळते. तटबंदीच्या आत मुख्य मंदिर आणि त्याचा परिसर उभारला जात असे.
हरिश्चंद्रगडाचे उदाहरण
हरिश्चंद्रगडावर हरिश्चंद्रेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराभोवतीही तटबंदी पाहायला मिळते. तुळजापूर मंदिराच्या तटबंदीशी तिची रचना काही प्रमाणात साधर्म्य दाखवते.
मंदिराची तटबंदी नेमकी काय?
मंदिराच्या बाहेरील बाजूला भक्कम भिंत उभारली जात असे. या भिंतीला तटबंदी किंवा संरक्षक भिंत म्हणता येते. तिच्या आत मंदिराची संपूर्ण व्यवस्था उभारली जात असे.
मंदिराला संरक्षण देण्याची गरज का पडली?
सतराव्या आणि अठराव्या शतकात महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता होती. वेगवेगळ्या राजसत्तांमध्ये संघर्ष सुरू होते. युद्धांचे वातावरणही वारंवार निर्माण होत होते.
मंदिरही सुरक्षित ठेवणे गरजेचे होते
अशा अस्थिर काळात धार्मिक स्थळांचे संरक्षण महत्त्वाचे होते. मंदिरांवर हल्ले होण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे मंदिराभोवती भक्कम तटबंदी उभारण्याची गरज निर्माण झाली.
मराठा काळात तटबंदीला महत्त्व
मराठा काळात मंदिरांच्या संरक्षणासाठी अशा तटबंदीचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याचे इतिहास अभ्यासक केतन पुरी सांगतात. मंदिर केवळ धार्मिक केंद्र नव्हते. ते अनेकदा सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्रही होते.
तुळजापूरच्या तटबंदीची गोष्ट!
तुळजापूर मंदिराची तटबंदी केवळ दगडांची भिंत नाही. ती त्या काळातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीची साक्ष आहे.