मोनिका क्षीरसागर
‘Seen’ झालेला मेसेज आणि रिप्लाय नाही समोरच्याने मुद्दाम दुर्लक्ष केल्यासारखं वाटल्याने मनात नकारात्मक विचार सुरू होतात.
रिप्लायची अपेक्षा पूर्ण न झाल्याने मेंदू अनिश्चिततेत अडकतो आणि “उत्तर का दिलं नाही?” हा प्रश्न वारंवार मनात येऊ शकतो.
आपल्याला नाकारलं गेल्याची भावना निर्माण झाली की भावनिक वेदना जाणवू शकतात; सामाजिक नकाराचा अनुभव मेंदूसाठी त्रासदायक असतो.
‘Seen’ हा छोटासा शब्दही मोठा ट्रिगर ठरू शकतो, कारण तो समोरच्याने मेसेज पाहिल्याची खात्री देतो, पण त्याने उत्तर का दिलं नाही हे सांगत नाही.
ओव्हरथिंकिंग वाढू शकतं
“तो/ती माझ्यावर नाराज आहे का?”, “मी काही चुकीचं बोललो का?” असे प्रश्न मनात घोळू लागतात.
सोशल मीडियावरील सततच्या नोटिफिकेशनची सवय असल्यामुळे लगेच रिप्लाय मिळण्याची अपेक्षा वाढते आणि उशिरा उत्तर मिळालं की बेचैनी जाणवू शकते.
मात्र प्रत्येक ‘Seen’ म्हणजे दुर्लक्षच असेल असं नाही; समोरची व्यक्ती व्यस्त असणे, काय उत्तर द्यायचं हे न सुचणे किंवा नंतर रिप्लाय करण्याचा विचार असणे शक्य आहे.
त्यामुळे ‘Seen’ वरून नात्याचा अर्थ ठरवण्याऐवजी परिस्थिती समजून घेणं, सतत फोन तपासणं टाळणं आणि गरज असल्यास थेट संवाद साधणं अधिक योग्य ठरतं.