Rahul Shelke
हा प्रश्न कधी तुमच्या मनात आलाय का? बहुतेक लोक याकडे लक्षच देत नाहीत!
आज स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा भाग झाला आहे. पण फोन चालण्यासाठी लागणारी सर्वात छोटी गोष्ट म्हणजे SIM कार्ड.
SIM कार्ड नीट पाहिलंत तर लक्षात येईल, त्याचा एक कोपरा कायम कापलेला असतो. हे काही डिझाइनसाठी नाही.
खूप वर्षांपूर्वी SIM कार्ड क्रेडिट कार्डइतके मोठे असायचे. ते पूर्ण चौकोनी असायचे.
तेव्हा लोकांना SIM कार्ड कोणत्या बाजूने घालायचे सरळ की उलटे, हे समजायचे नाही.
चुकीच्या पद्धतीने SIM घातल्यामुळे फोनचा स्लॉट खराब व्हायचा, नेटवर्कही यायचा नाही.
ही अडचण दूर करण्यासाठी डिझायनर्सनी SIM कार्डचा एक कोपरा कापण्याचा निर्णय घेतला.
फोनच्या SIM स्लॉटमध्येही तसाच कापलेला कोपरा असतो. म्हणजे SIM फक्त योग्य दिशेनेच बसेल. यामुळे फोनचे नुकसान झाले नाही.
आज SIM कार्ड नॅनो, मायक्रो झाले पण कापलेला कोपरा अजूनही आहे. कारण या छोट्या डिझाइनमुळे मोठा बदल झाला.