Rahul Shelke
बाळासाठी आईचं दूध हेच सर्वात नैसर्गिक आणि उत्तम आहार आहे. विशेषतः जन्मानंतरचे पहिले काही महिने ते खूप महत्त्वाचं असतं.
तज्ज्ञांच्या मते बाळाला पहिले 6 महिने फक्त आईचं दूध द्यावं. या काळात पाणी/इतर दूध देणं टाळावं.
आईच्या दुधात प्रथिनं, फॅट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स सगळं योग्य प्रमाणात असतं.
लहान बाळाचं पोट आणि पचनसंस्था नाजूक असते. आईचं दूध सहज पचतं, त्यामुळे त्रास होत नाही.
डिलिव्हरीनंतर येणारं पहिलं दूध म्हणजे कोलोस्ट्रम. हे बाळासाठी नैसर्गिक संरक्षण मानलं जातं.
आईच्या दुधात अँटीबॉडीज असतात. त्यामुळे संसर्ग, जुलाब, कानाचा त्रास अशा गोष्टींपासून बचाव होऊ शकतो.
डॉक्टरांच्या मते 1 वर्षापूर्वी गाईचं दूध देऊ नये. कारण त्यातील प्रथिनं आणि मिनरल्समुळे बाळाच्या किडनीवर ताण येऊ शकतो.
गाईच्या दुधात काही पोषक घटक कमी असतात. काही बाळांना यामुळे अॅनिमिया/पोटाचा त्रास होण्याचा धोका असतो.
बाळ 1 वर्षाचं झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने गाईचं दूध सुरू करता येतं. आईचं दूध शक्य असेल तर 2 वर्षांपर्यंत देणं फायदेशीर. (डॉक्टरांचा सल्ला घ्या)