पुढारी वृत्तसेवा
कपडे जोडण्यापासून ते आपत्कालीन जुगाडापर्यंत घरात हमखास आढळणारी वस्तू म्हणजे ‘सेफ्टी पिन’. आपण सर्वांनीच ती वापरली आहे
सेफ्टी पिनच्या खालच्या बाजूला एक छोटेसे छिद्र का असते? हे छिद्र केवळ डिझाईनचा भाग नसून, त्यामागे महत्त्वाचे वैज्ञानिक कारण दडलेले आहे
सेफ्टी पिनला खालच्या बाजूला तार गोल फिरवून एक ‘कॉईल’ तयार केलेली असते. हेच छिद्र स्प्रिंगसारखे काम करते
या स्प्रिंगमुळे पिनच्या टोकाला योग्य अँगल आणि ताण मिळतो. हा ताणच पिनच्या अणकुचीदार टोकाला लॉकच्या आत घट्ट पकडून ठेवण्यास मदत करतो
जर हे छिद्र किंवा स्प्रिंग नसेल, तर पिन वारंवार उघडली जाईल, कपड्यांवरील पकड सैल होईल आणि टोचून इजा होण्याची भीती वाढेल
सेफ्टी पिनचा वापर काही आजचा नाही. प्राचीन काळी लॅटिन भाषेत याला ‘फिबुला’ म्हटले जाई
स्प्रिंगवाली सेफ्टी पिनचा शोध 1849 मध्ये वॉल्टर हंट यांनी लावला, त्यांनी एकाच तारेतून स्प्रिंग मेकॅनिझम तयार केले
कांस्य युगात युरोपमध्ये कपडे शरीरावर टिकवून ठेवण्यासाठी या पिनचा वापर सुरू झाला होता
उत्तर युरोपमध्ये दोन वेगवेगळ्या भागांपासून पिन बनवली जात, त्यात स्प्रिंग नव्हती. हंट यांच्या डिझाईनमुळे पिन वापरणे सोपे, सुरक्षित झाले