पुढारी वृत्तसेवा
संशोधनानुसार, जास्त वजन असलेल्या महिलांनी वजनात अगदी 5 ते 10 टक्के घट केली तरी प्रजननक्षमतेत सुधारणा दिसून येऊ शकते.
लठ्ठपणामुळे काही महिलांमध्ये गर्भपाताचा (Miscarriage) धोका वाढू शकतो. त्यामुळे गर्भधारणेपूर्वी वजन नियंत्रणात आणण्याचा सल्ला दिला जातो.
जास्त वजनामुळे Gestational Diabetes चा धोका वाढतो. याचा परिणाम आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यावर होऊ शकतो.
लठ्ठपणामुळे गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब आणि प्री-एक्लॅम्प्सियाचा धोका वाढतो.
वजन नियंत्रणात असल्यास IVF आणि इतर प्रजनन उपचारांचा यशाचा दर तुलनेने चांगला असू शकतो.
योग्य वजनामुळे बाळाचा विकास चांगला होण्यास मदत होते आणि प्रसूतीतील काही गुंतागुंत कमी होऊ शकते.
डॉक्टरांचा उद्देश केवळ वजन कमी करणे नसतो, तर आई आणि बाळासाठी अधिक सुरक्षित व निरोगी गर्भधारणा सुनिश्चित करणे हा असतो.