उन्हाळ्यात कितीही पाणी पिलं तरी तहान का लागते? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण

पुढारी वृत्तसेवा

पाणी पिलं तरी तहान लागते

कडक उन्हाळ्यात अनेकांना वारंवार तहान लागते. यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत.

Drinking Water | Pudhari

उष्णतेमुळे जास्त घाम येतो

उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे घाम जास्त येतो. घामाद्वारे पाणी आणि क्षार दोन्ही बाहेर पडतात. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते.

Drinking Water | Pudhari

निर्जलीकरण (Dehydration) होते

घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. यालाच निर्जलीकरण म्हणतात.

Drinking Water | Pudhari

फक्त पाणी पुरेसे नाही

आपण तहान लागली की पाणी पितो. पण घामावाटे गेलेले खनिजे (Electrolytes) भरून निघत नाहीत. म्हणून पुन्हा तहान लागते.

Drinking Water | Pudhari

इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता

सोडियम, पोटॅशियम यांसारखे क्षार शरीरासाठी महत्त्वाचे असतात. घामामुळे हे घटक कमी होतात. म्हणून मेंदू तहान लागल्याचे संकेत देतो.

Drinking Water | Pudhari

चहा-कॉफीमुळेही तहान वाढते

कॅफिन असलेली पेये शरीरातील पाणी कमी करू शकतात. चहा, कॉफी किंवा साखरयुक्त शीतपेये डिहायड्रेशन वाढवतात. यामुळे तहान अधिक लागते.

Drinking Water | Pudhari

एकाच वेळी जास्त पाणी पिणेही चुकीचे

काही वेळा लोक खूप जास्त पाणी एकदम पितात. यामुळे शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी होते.
त्याला Water Toxicity असे म्हणतात.

Drinking Water | Pudhari

तहान कमी करण्यासाठी काय करावे?

फक्त पाणी न पिता इलेक्ट्रोलाइट्सयुक्त पेये घ्या. नारळ पाणी, ताक, लिंबू सरबत पिणे फायदेशीर ठरते. यामुळे शरीरातील क्षार वाढतात.

Drinking Water | Pudhari

संजू सॅमसनची संपत्ती किती? आकडा वाचून थक्क व्हाल

Sanju Samson Net Worth | Pudhari
येथे क्लिक करा