Rahul Shelke
न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये संजू सॅमसनने 89 धावांची शानदार खेळी केली. ही टी20 वर्ल्ड कप फायनलमधील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या आहे.
या स्पर्धेत सॅमसनने 321 धावा करत एका टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान मिळवलं.
सॅमसनने सेमीफायनल आणि अंतिम फायनलमध्ये अर्धशतक झळकावले.
सॅमसनने 5 डावांत 321 धावा केल्या. त्याचा सरासरी 80.25 आणि स्ट्राईक रेट 199 पेक्षा जास्त होता.
IPL 2026 साठी संजू सॅमसनने चेन्नई सुपर किंग्ससोबत 18 कोटी रुपयांचा करार केला आहे.
सॅमसन BCCI च्या ग्रेड C कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे. त्याला दरवर्षी सुमारे 1 कोटी रुपये रिटेनर फी मिळते.
प्रत्येक टी20 सामन्यासाठी सुमारे 3 लाख रुपये तर वनडे सामन्यासाठी सुमारे 6 लाख रुपये मिळतात.
2012 ते 2026 या 15 वर्षांच्या IPL करिअरमध्ये सॅमसनने 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
2026 मध्ये त्याची एकूण संपत्ती सुमारे 85 ते 100 कोटी रुपयांदरम्यान असल्याचा अंदाज आहे.
सॅमसन तिरुवनंतपुरममधील आलिशान घरात राहतो. त्याच्याकडे Range Rover, Audi, Mercedes, BMW आणि Lexus सारख्या लक्झरी गाड्या आहेत.