Rahul Shelke
पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे जातात, तिथे काळ्या कपड्यांत आणि काळ्या चष्म्यात SPG कमांडो नेहमी दिसतात.
हा काळा चष्मा फक्त स्टाईलसाठी नसतो. तो त्यांच्या सुरक्षेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो.
SPG म्हणजे Special Protection Group. 1985 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर या विशेष सुरक्षादलाची स्थापना झाली.
SPG कमांडो पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि काही विशेष पाहुण्यांची सुरक्षा करतात.
कमांडो सतत चारही बाजूंनी लक्ष ठेवतात. काळ्या चष्म्यामुळे त्यांची नजर कुठे आहे हे कुणालाही कळत नाही.
प्रकाश, फ्लॅश, स्फोट किंवा गोळीबार झाला तर सामान्य माणसाच्या डोळ्यांवर परिणाम होतो. काळा चष्मा कमांडोंच्या डोळ्यांचे संरक्षण करतो.
डोळे सुरक्षित असल्याने कमांडो क्षणात परिस्थिती ओळखून कारवाई करू शकतात.
काळा चष्मा घातल्यामुळे कमांडो प्रभावी दिसतात. यामुळे संशयित व्यक्ती गोंधळते.
तासन्तास उभं राहावं लागतं. प्रकाश, धूळ आणि वाऱ्यापासून डोळ्यांचं संरक्षण करणं गरजेचं असतं.