चाळीशीत बायका नवऱ्यांवर संशय का घेतात? डॉक्टरांनी सांगितलं कारण

पुढारी वृत्तसेवा

चाळीशीत बायका नवऱ्यांवर संशय का घेतात?

नवऱ्याच्या बदललेल्या वागण्यामागे नेहमीच अफेअर असेल, असे नाही!

डॉक्टरांनी सांगितलं कारण

सेक्सॉलॉजिस्ट आणि जनरल फिजिशियन डॉ. राजेंद्र साठे यांनी यावर भाष्य केलं आहे.

वयाच्या 35-40 नंतर बदल?

काही पुरुषांमध्ये हार्मोन्समध्ये बदल होऊ शकतात. टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ शकते.

आत्मविश्वास कमी होतो

लैंगिक कार्यक्षमतेत बदल जाणवल्यास पुरुषाचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. पत्नीपासून तो दूर राहू लागतो.

मग पत्नीला संशय येतो!

“हा माझ्याजवळ का येत नाही?” “याचं दुसरीकडे काही सुरू आहे का?” असे प्रश्न मनात येऊ शकतात.

खरं कारण वेगळंही असू शकतं

काही पुरुषांना इरेक्टाईल डिसफंक्शनची समस्या असू शकते. म्हणजे लिंगात पुरेसा कडकपणा न येणे.

शीघ्रपतनाचाही त्रास

काही जणांना शीघ्रपतनाची समस्या असते. या समस्यांमुळे पत्नीसमोर जाण्याचाही आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

महिलांमध्येही होतात बदल

वाढत्या वयानुसार महिलांमध्येही काही शारीरिक बदल होऊ शकतात. कामेच्छेत बदल जाणवू शकतात.

उपचार शक्य आहेत

या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या

संशय नाही, संवाद हवा!

नात्यातील प्रत्येक बदलामागे अफेअरच असेल, असे नाही. मोकळेपणाने बोला आणि गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

मुंबईत मोठ्या गणेशमूर्तींची परंपरा कोणी सुरू केली?

येथे क्लिक करा